(कविवर्य मंगेश पाडगांवकर यांची माफी मागून)
Code म्हणजे Code म्हणजे code असतो,
लिहिता आला तर ठीक; नाहीतर उगाचीच डोकेफोड असतो
काय म्हणालात?
code लिहणं तुम्हाला चिल्लर वाटतं,
कविता करण्यापेक्षाही थिल्लर वाटतं,
मग, तुम्ही code कधी लिहिलाच नाही,
मेंदूचा भुगा कधी केलाच नाही,
कारण....
Code म्हणजे Code म्हणजे code असतो,
लिहिता आला तर ठीक; नाहीतर उगाचीच डोकेफोड असतो
first year पासूनच coding चे वारे घुमू लागतात...
C, C++, Java classes च्या वाऱ्या सुरु होतात....
if , for , while चा विचित्र खेळ सुरु होतो....
अजून कळलं नाही go to कशासाठी असतो....
complexity सतावते सतत मनाला....
pointers जीव घेतात क्षणाक्षणाला...
आठवतं ना?
तुमचा-माझा पहिला “hello world” चा code run झाला होता...
मित्रांपासून आईपर्यंत सर्वाना दाखवला होता...
तेव्हा कुठे माहिती होतं?
coding च्या दुनियेत नुकताच प्रवेश झाला आहे...
हा तर फक्त उंबरठा ओलांडला आहे....
पण काहीही असो...
code run झाल्याचा आनंद अजोड असतो,
Code म्हणजे Code म्हणजे code असतो
लिहिता आला तर ठीक; नाहीतर उगाचीच डोकेफोड असतो
काही जण गोडीने code करतात...
तर काही जण जोडीने code करतात...
काही जण इतके गुंतून जातात,
कि दिवस-रात्र code च करतात....
आणि काही copy paste ने भागवतात...
अशातला एक जण मला म्हणाला,
“४ वर्षे सरली पण मी कधी code नाही केला,
माझ कधीच काही बिघडलं नाही,
pen drive मुळे सुरळीत पार पडलं सर्व काही”
पण....
code नेच कुठे तरी नोकरी मिळते...
पोटाची खळगी तेव्हाच तर भरते....
या code मुळेच लोक ओळखतात...
software engineer ची पदवी लावतात...
कुठेही भेटले तर मानाने(?) बघतात.....
असा हा code आपल्या आयुष्याच्या tree मधला root node असतो,
Code म्हणजे Code म्हणजे code असतो
लिहिता आला तर ठीक; नाहीतर उगाचीच डोकेफोड
असतो
-- Dheeraj Kasar